अनिल अंबानी यांच्या विरोधातल्या दिवाळखोरी प्रकियेच्या कार्यवाहीला स्थगिती
नवी दिल्ली: दिल्ली उच्च न्यायालयानं रिलायन्स कम्युनिकेशनचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्या विरोधातल्या दिवाळखोरी निराकरण प्रकियेच्या कार्यवाहीला स्थगिती दिली आहे. भारतीय स्टेट बँकेनं अनिल अंबानीच्या दोन कंपन्यांना दिलेल्या बाराशे कोटी रुपये कर्जाच्या वसूलीबाबतच हे प्रकरण असून अनिल अंबानीनं २०१६ साली त्यासाठी ५६५ आणि ६३५ कोटी रुपयांची व्यक्तीगत हमी दिली होती.
न्यायमुर्ती विपिन सांघी आणि रजनीश भटनागर यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत अनिल अंबानी त्याची कोणतीही मालमत्ता, हक्क विकू किंवा हस्तातंरित करु शकणार नाही असं न्यायालयानं म्हटलं आहे.
न्यायालयानं या संदर्भात येत्या ६ ऑक्टोबरपर्यंत केंद्र सरकार, स्टेट बँक तसंच भारतीय दिवाळखोरी मंडळाला आपलं म्हणणं मांडण्यासाठी मुदत दिली आहे.
