‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिका सोडणार नाही – अमोल कोल्हे
डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला सोडचिट्ठी देत काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आठवड्याभरातच राजकारणात सक्रीय होण्यासाठी ते ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मालिका सोडणार अशा चर्चांना उधाण आलं. झी मराठीवर अमोल कोल्हे यांच्या ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. मात्र राजकारणात अधिक लक्ष घालण्यासाठी अमोल कोल्हे ही मालिका सोडणार अशा चर्चा सुरू झाल्या. अखेर फेसबुक पोस्टद्वारे अमोल कोल्हे यांनी चर्चांना स्वल्पविराम दिला आहे.
“आता News Channel वरून ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरत आहेत त्यापैकी कोणत्याही प्रकारच्या बातमीवर विश्वास ठेवू नका हि नम्र विनंती. मालिका सोडण्याचा कोणताही निर्णय किंवा विचारही झालेला नाही.
छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेतून जगासमोर मांडण्याचे कार्य अविरत चालू राहील!
धन्यवाद!”
त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका असं डॉ. अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्टद्वारे स्पष्ट केलं आहे.
