Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

अमरावती विद्यापीठाचा अतिरिक्त प्रभार डॉ. प्रमोद येवले यांचेकडे सुपूर्द

अमरावती विद्यापीठाचा अतिरिक्त प्रभार डॉ. प्रमोद येवले यांचेकडे सुपूर्द

मुंबई, दि. ३: राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी एका आदेशान्वये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांचेकडे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. यासोबतच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरु नियुक्तीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांच्या निधनामुळे दिनांक २८ जानेवारी पासून हे पद रिक्त झाले होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *