Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जलजागृती सप्ताहानिमित्त अकोला येथे ‘वॉटर रन’द्वारे जनजागृती

जलजागृती सप्ताहानिमित्त अकोला येथे ‘वॉटर रन’द्वारे जनजागृती

अकोला: अकोला सिंचन मंडळ व अकोला पाटबंधारे विभागाच्या वतीने जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहाचा मुख्य उद्देश पाण्याची बचत व पाण्याचा वापर काटकसरीने करणे तसेच पाण्याचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे आहे. याकरिता नेहरु पार्क, अकोला येथून ‘वॉटर रन’ ला अकोला सिंचन मंडळाच्या कार्यकारी अभियंता स्मिता मानकर व उपअधीक्षक अभियंता शिल्पा आळशी यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.

नेहरु पार्क येथून गोरक्षण मार्गाने संत तुकाराम चौक व परत नेहरु पार्कपर्यंत वॉटर रन व चित्ररथाद्वारे जलजागृती करण्यात आली. यावेळी अकोला सिंचन मंडळ व अकोला पाटबंधारे विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’, ‘पाणी बचाव’ अशा घोषणा देत जनजागृतीचे संदेश नागरिकापर्यंत पोहोचविले. यावेळी अकोला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अ.खु.वसुलकर, अकोला सिंचन मंडळाच्या कार्यकारी अभियंता स्मिता मानकर, उपअधिक्षक अभियंता शिल्पा आळशी, उपविभागीय अधिकारी अनिल राठोड, शाखा अभियंता गोपाल चव्हाण, अकोला पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *