वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे अकोला जिल्ह्यात येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी लागू
अकोला, दि.१७ : अकोला जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात हा आदेश लागू करण्यात आला असून पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही.
