अकोल्यात परतीच्या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान
अकोला: अकोल्यात खरीप हंगामात सततचा पाऊस आणि परतीच्या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
थंडीत वाढ झाल्यानं तुरीचं पीक चांगल्या स्थितीत असताना काही दिवसापासून परिसरात ढगाळ वातावरण असल्यामुळे पीक धोक्यात सापडलं आहे.
वातावरणातील बदल आणि पावसामुळे खरीप हंगामातील पिकांची नासाडी झाली. सोयाबीन आणि कपाशी पिकालाही परतीच्या पावसानं दणका दिला आहे.
सध्या तुरीवर अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्यानं तुरीच्या उत्पादनातही घट होण्याची शक्यता असल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
