पावसाळी अधिवेशनात आवाज उठवण्याचा अजित पवार यांचा इशारा
मुंबई, दि. ११ : कोरडवाहूसाठी हेक्टरी ७५ हजार, तर बागायतीसाठी हेक्टरी दीड लाख रुपयांची मदत देण्याची मागणी, आम्ही केली होती, त्याकडे दुर्लक्ष करून मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीग्रस्तांवर अन्याय केला असल्याचा आरोप, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.
तीन हेक्टरच्या मर्यादेमुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत, त्यामुळे ही अट शिथिल करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. राज्य सरकारनं या निर्णयाचा फेरविचार करुन अतिवृष्टीग्रस्तांना अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी विधीमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठवण्यात येईल, असा इशारा पवार यांनी दिला.
