केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असताना सावरकरांना ‘भारतरत्न’ का दिला नाही? : उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई: आज विधानसभेत भाजपतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून राज्य सरकारतर्फे वीर सावरकरांच्या गौरवाचा ठराव मांडला जावा अशी मागणी करण्यात आली होती. जी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी नियमावर बोट ठेवत फेटाळून लावली.
पुढे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या ‘शिदोरी’ मासिकावर बंदी आणण्याची देखील मागणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की स्वातंत्र्यवीर सावरकरांचे देशासाठीचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही. केंद्रात व राज्यात भाजपाचं सरकार असताना सावरकरांना ‘भारतरत्न’ का दिला गेला नाही? असा सवालही त्यांनी भाजपला केला.
