Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मिशन शिवभोजन : मुंबईत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तर पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते केंद्रांचे उद्घाटन

मिशन शिवभोजन : मुंबईत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तर पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते केंद्रांचे उद्घाटन

मुंबई: राज्यात आज ठिकठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील १० रुपयात जेवण थाळी उपलब्ध होणाऱ्या शुभारंभ झाला.
पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई उपनगर महसूल कर्मचारी उपहारगृह येथे नागरिकांसाठी १० रुपयांत आहार असलेल्या ‘शिवभोजन’ या योजनेचे उद्घाटन केले.

यावेळी ते म्हणाले की, “पोटाला जात, पात, धर्म आणि आर्थिक स्थितीचे निकष न लावता सर्वांना स्वस्त आणि दर्जेदार आहार मिळावा हेच या योजनेचे उद्दिष्ट आहे.”

पुण्यातही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शिवभोजन केंद्राचे उद्घाटन केले. पुणे महानगरपालिका भवनाच्या निशिगंध हॉटेलमध्ये ‘शिवभोजन’ योजनेचा यांच्याहस्ते शुभारंभ झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही ठाण्यात शिवभोजन केंद्राचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी जेवणाचा अस्वादही घेतला.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *