उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट
नवी दिल्ली, दि. १३ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार व पुत्र पार्थ पवार उपस्थित होते. यावेळी प्रधानमंत्र्यांनी महायुतीच्या ऐतिहासिक विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आणि विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती अजित पवार यांनी समाज माध्यमांवर दिली.
Source – AIR
