दुधाला हमी दर आणि उत्पन्नावर आधारित दर पद्धती लागू करावी अशी केली मागणी
राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे केंद्र आणि राज्य सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी आज किसान सभेच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यात अकोले संगमनेर तहसील कार्यालयांवर मोर्चे काढून शेतकऱ्यांनी निदर्शनं केली.
लॉकडाऊन काळात दुधाला दर पाडून देणाऱ्या दूध संघांची चौकशी करावी, दुधाला हमी दर आणि उत्पन्नावर आधारित दर अशी दुहेरी पद्धत लागू करावी यासह शेतकरी आणि आदिवासींसाठीच्या योजनांची अंमलबजावणी इत्यादी मागण्यांसाठी डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे.
Source – AIR
