अग्निवीर योजनेअंतर्गत आतापर्यंत ५९,९११ उमेदवारांची आर्मी रिक्रूटमेंट ऑफिस नागपूर येथे नोंद
नागपूर : भारतीय सैन्यात अग्निवीर योजने अंतर्गत आतापर्यंत ५९,९११ उमेदवारांनी आर्मी रिक्रूटमेंट ऑफिस (ARO), नागपूर इथं नोंदणी केली आहे. गेल्या दोन दिवसांत ६ हजाराहून अधिक नोंदणी झाली आहे.
नागपूर, वर्धा, वाशिम, अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या पुरुष उमेदवारांसाठी ५ जुलैपासून सुरू झालेल्या सैन्य भरती मेळाव्यासाठीच्या नोंदणीचा काल शेवटचा दिवस होता. यातल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी, कागदपत्रांची पडताळणी २२ सप्टेंबरला नागपूर इथं होणार आहे.
