Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांच्या ग्रंथसंपदेबाबत; वाचा संपूर्ण यादी

आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांच्या ग्रंथसंपदेबाबत; वाचा संपूर्ण यादी

महाराष्ट्रातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व राहिलेल्या आचार्य प्र. के. अत्रे यांची आज जयंती. आचार्य अत्रे यांनी मराठी साहित्य विश्वाला अनमोल देणगी दिली. त्यांनी लिहिलेल्या कथा, कादंबऱ्या, नाटके, सामाजिक लेख, कविता महाराष्ट्रातील वाचकांसाठी सदैव अनमोल नजराणा राहिली आहे. आज आम्ही तुम्हाला याच खजिन्याशी ओळख करून देणार आहोत.

शाळांसाठी क्रमिक पुस्तके

आचार्य अत्र्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांनी आणि शंकर केशव कानेटकर (कवी गिरीश) यांनी संपादित केलेली अरुण वाचनमाला नावाची मराठीची क्रमिक पुस्तके शाळेच्या इंग्रजी पहिली ते इंग्रजी पाचवी (हल्लीची पाचवी ते नववी) च्या अभ्यासक्रमांत होती, सन १९३४ साली निघालेल्या या क्रमिक पुस्तकांसारखी सुरेख पुस्तके त्यापूर्वी आणि त्यानंतर कधीही निघाली नाहीत, असे शिक्षकांचे आणि पालकांचे मत आहे. ही पुस्तके पहायला मिळणेही अशक्यप्राय झाल्याने, डिंपल प्रकाशनाने या पुस्तकांची नवीन पुनर्मुद्रित आवृत्ती आचार्य अत्रे यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त १३ ऑगस्ट २०१७ रोजी बाजारात आणली आहे. आचार्य अत्रे यांचे नवयुग मराठा साप्ताहिकाचा पहिला अंक १९४० २१ जानेवारी रोजी प्रकाशित झाला.

आचार्य अत्रे आणि गिरीश दोघेही हाडाचे द्रष्टे शिक्षक होते. त्यावेळी ते अनुक्रमे कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल आणि न्यू इंग्लिश स्कूल, पुणे येथे मराठीचे अध्यापक होते. अत्रे तर लंडनहून शिक्षणशास्त्रातील उच्च पदविका घेऊन परतले होते; आणि शाळेचे मुख्याध्यापक होते. तेव्हा अशा जाणकारांच्या अनुभवातून ही पुस्तके तयार झाली आणि एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे अवघ्या शिक्षणक्षेत्राला दिशादर्शकाचे काम करू लागली. २०१७ सालीही या पुस्तकांतील कल्पना कालसुसंगत असल्याचे जाणवते. पुस्तकांच्या प्रस्तावनेत उल्लेख केल्याप्रमाणे ही पुस्तके आधुनिक भाषा-शिक्षणाची व अध्यापनशास्त्राची तत्त्वे लक्षात घेऊन तयार केली आहेत. पुस्तकांची रचना (Design) करताना कला आणि वाङ्मय हा मुख्य दृष्टिकोन ठेवला आहे. पुस्तके मनोरंजक करण्याच्या प्रयत्नात फार सोपी होतात आणि शैक्षणिकदृष्ट्या निरुपयोगी ठरतात. ‘मनोरंजकत्व म्हणजे सुलभत्व नव्हे!’ गद्य-पद्य लेखनातील विविध फुलोरे, छटा आणि तऱ्हा यांचा मनोज्ञ संगम या पुस्तकांत अनुभवायला मिळेल. सारांश, राष्ट्रीय, महाराष्ट्रीय आणि मानवी अशा तिहेरी दृष्टीने या पुस्तकांची केलेली रचना जाणकारांना प्रतीत होईल.’

नाटके

अशी बायको हवी
उद्याचा संसार
एकच प्याला-विडंबन
कवडीचुंबक
गुरुदक्षिणा
घराबाहेर
जग काय म्हणेल?
डॉक्टर लागू
तो मी नव्हेच
पराचा कावळा
पाणिग्रहण
प्रल्हाद(नाटक)
प्रीतिसंगम (नाटक)
बुवा तेथे बाया
ब्रम्हचारी
भ्रमाचा भोपळा
मी उभा आहे
मी मंत्री झालो
मोरूची मावशी
लग्नाची बेडी
वंदे भारतम
वीरवचन
शिवसमर्थ
सम्राट सिंह
साष्टांग नमस्कार
काव्य
गीतगंगा
झेंडूची फुले

कथासंग्रह

अशा गोष्टी अशा गंमती
कशी आहे गम्मत
कावळ्यांची शाळा
फुले आणि मुले
बत्ताशी आणि इतर कथा

आत्मचरित्र
कऱ्हेचे पाणी – खंड एक ते पाच

कादंबऱ्या

चांगुणा
मोहित्यांचा शाप

इतर

अत्रेटोला
अत्रेप्रहार
अत्रेवेद
अध्यापक अत्रे

अप्रकाशित आचार्य अत्रे (संपादक : डॉ. नागेश कांबळे)
आमदार आचार्य अत्रे
आषाढस्य प्रथम दिवसे
इतका लहान एवढा महान
केल्याने देशाटन
क्रांतिकारकांचे कुलपुरुष
चित्रकथा भाग-१
चित्रकथा भाग-२
जय हिंद जय महाराष्ट्र
झालाच पाहिजे
दलितांचे बाबा
दूर्वा आणि फुले
मराठी माणसे, मराठी मने
महापूर
महाराष्ट्र कालचा आणि आजचा
मी अत्रे बोलतोय
मी कसा झालो?
मुद्दे आणि गुद्दे
वस्त्रहरण
विनोद गाथा
विनोबा
संत आणि साहित्य
समाधीवरील अश्रू
सिंहगर्जना
सुभाष कथा
सूर्यास्त
हंशा आणि टाळ्या
हार आणि प्रहार
हास्यकट्टा
हुंदके

कंटेंट क्रेडिट – Wikiwand

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *