Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

……म्हणून ‘महाराष्ट्र वार्ता’ ने ‘या’ दोघांना पाठवली ५ कोटींच्या अब्रुनुकसानीची नोटीस; जरूर वाचा

……म्हणून ‘महाराष्ट्र वार्ता’ ने ‘या’ दोघांना पाठवली ५ कोटींच्या अब्रुनुकसानीची नोटीस; जरूर वाचा

मुंबई: दिनांक ७ मार्च रोजी टीम महाराष्ट्र वार्ताने मुंबईतील नायर इस्पितळात असलेल्या औषधालयात चालणाऱ्या घोटाळ्याबाबत येथील प्रशासकांकडून प्रतिक्रिया घेण्यासाठी थेट धडक दिली होती. यावेळी पॅनल ऑडिटर कैलाश सिंग व त्यांचे सहकारी रमेश गुप्ता अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीत या वादग्रस्त मेडिकल चे व्यवस्थापक चंद्रेश गुप्ता यांना येथील निकृष्ट दर्जाच्या औषधांबाबत प्रतिक्रिया विचारली होती. यावेळी त्यांनी व त्यांचे सहकारी रोशन झा यांनी उडवाउडवीची उत्तरे देत आमच्या प्रतिनिधीवर हे सारे आम्ही “पैशांसाठी करत असल्याचा’ गंभीर व महाराष्ट्र वार्ताची प्रतिमा मलिन करणारा आरोप केला जो निराधार होता. वस्तुस्थितीपासून दूर पळण्यासाठी त्यांनी सदर आरोप केला होता हे व्हिडिओ बातमी पाहणाऱ्यांच्या सहज लक्षात येईल.

मुळात येथे भेट देण्यापूर्वी आम्ही या बाबतचे वृत्त साधारण आठवड्यापूर्वी आमच्या न्युज पोर्टल वर प्रसिद्ध केले होते. यानंतर लोकांच्या जीविताशी खेळणाऱ्या या लोकांची झोप उडाली होती. मुळात कोणाही गुप्तहेराची ओळख ‘महाराष्ट्र वार्ता’ कधीच प्रसिद्ध करत नाही. तर या वेळीही आम्ही ती का उघड करावी? एकूणच शनिवार दि.७ रोजी घडलेल्या या घटनेमुळे ‘वार्ता ग्लोबल मीडिया’ संचालित महाराष्ट्र वार्ता ने चंद्रेश गुप्ता व रोशन झा या दोघांना आमचे वकिल श्री. प्रसाद दामले यांच्या करवी ५ कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा टाकण्याबाबत व फौजदारी कारवाईबाबत आज दि. १३ रोजी नोटीस धाडली आहे. मुळात चोरी करणाऱ्यांनी अशी शिरजोरी करणं आणि निष्पक्ष व शुद्ध पत्रकारितेसाठी नामांकित असलेल्या महाराष्ट्रवार्ता.कॉम वर असे आरोप करणे हे भूषणावह नाही. याला कारण अशा समाजकंटकांना कायद्याची नसलेली भीती हे आहे इतके नक्की.

अब्रुनुकसानीच्या दाव्या संदर्भात नोटीस पहा :

global maharashtra varta notice(1)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *