अद्याप पॅन कार्ड आधार शी संलग्न न केलेल्यांना आजची शेवटची संधी; जाणून घ्या थोडक्यात
मुंबई, दि. ३०: पर्मनंट अकाउंट नंबर – ‘पॅन आणि ‘आधार क्रमांक संलग्न करण्याची मुदत आज संपत आहे. ही प्रक्रिया आज पूर्ण न केल्यास पॅन धारकांना अनेक तांत्रिक अडचणींचा आणि आर्थिक दंडाचा सामना करावा लागू शकतो. हे संलग्निकरण न केल्यास पॅन क्रमांक उद्या एक जुलैपासून आपोआप अकार्यरत होईल, प्राप्तिकर विभागाकडून कर परतावा मिळणार असेल तर तो मिळणार नाही, प्राप्तिकर परताव्यावर व्याज लागू असेल तर ते देण्यात येणार नाही, काही प्रकरणांमध्ये अतिरिक्त करही कापला जाईल, असं प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केलं आहे.
