आता लसीकरणं, औषधोपचार आणि रुग्णालयात दाखल होण्यासाठी आधारची सक्ती नाही
आधारकार्ड नसल्यामुळे कुणालाही लसीकरण तसेच औषधोपचार आणि रुग्णालयातला प्रवेश नाकारला जाऊ नये असं भारताच्या एकात्मिक ओळख प्राधिकरण अर्थात यु.आय.डी.ए.आय. नं स्पष्ट केलं आहे.
आधारकार्ड नसल्यामुळे अशा प्रकारच्या वैद्यकीय सेवा नाकारल्यासंदर्भात माध्यमांमधे आलेल्या वृत्तांनंतर प्राधिकरणाने याबाबत निवेदन जाहीर केलं आहे.
आधार कार्डाचा गैरवापर करत सेवा नाकारल्या जाऊ नयेत, उलट अशाही परिस्थितीत सेवा देण्यासंदर्भातली तरतूद आधारविषयक कायद्यात आहे असं प्राधिकरणाने स्पष्ट केलं आहे.
Source – AIR
