Tukaram Mundhe IAS
‘द इंडियन एक्स्प्रेस एक्सलन्स इन गव्हर्नन्स अवॉर्ड’ तुकाराम मुंढे (भा.प्र.से.) यांना जाहीर
‘द इंडियन एक्स्प्रेस एक्सलन्स इन गव्हर्नन्स अवॉर्ड’ या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी प्रथमच प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची निवड झाली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडमध्ये (पीएमपीएमएल) केलेल्या आदर्श कामगिरीसाठी तुकाराम मुंढे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. माजी मुख्य न्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने मुंढे यांच्या कामाचे मूल्यांकन केले होते. मूल्यांकन केल्यानंतर या पुरस्कारासाठी मुंढे यांची निवड केली आहे.
https://twitter.com/Tukaram_Indias/status/1095738934120931329
‘द इंडियन एक्स्प्रेस एक्सलन्स इन गव्हर्नन्स अवॉर्ड’ या पुरस्काराची सुरुवात या वर्षा पासूनच करण्यात आली आहे, आणि पहिलाच पुरस्कार राज्यातील प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांना जाहीर झाला आहे. तुकाराम मुंढे यांनी आपल्याला हा पुरस्कार मिळल्याबद्ल सर्वांचे आभार मानले. हा पुरस्कार मला दिल्याबद्दल मी खूप आंनदी आहे असे ट्विट तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
