“ही दडपशाही बघून हिटलरने सुद्धा शरमेने मान घातली असती.”- दिल्ली न्यायाधीश बदली प्रकरणी जितेंद्र आव्हाडांची टीका
मुंबई: दिल्लीत उसळलेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. मुरलीधर यांनी दिल्ली पोलिसांनी प्रक्षोभक विधाने करणाऱ्या भाजप नेत्यांवर का कारवाई केली नाही असा प्रश्न विचारला होता. यानंतर काही तासातच त्यांची हरियाणा न्यायालयात बदली करण्यात आल्याचे समोर आले आहे. या नंतर आता चोही बाजूंनी भाजप व केंद्र सरकारवर टीका करण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तर जळजळीत ट्विट करत पंतप्रधान मोदींची व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची जर्मन हुकूमशाह हिटलरशी अप्रत्यक्ष तुलना केली आहे.
ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, “‘भाजप नेत्यांच्या भडकाऊ भाषणावर कारवाई का केली नाही’ असा दिल्ली पोलिसांना प्रश्न विचारणारे दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश मुरलीधर यांना त्यांच्या कर्तव्याचे बक्षीस म्हणून त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. ही दडपशाही बघून हिटलरने सुद्धा शरमेने मान घातली असती.”
'भाजप नेत्यांच्या भडकाऊ भाषणावर कारवाई का केली नाही' असा दिल्ली पोलिसांना प्रश्न विचारणारे दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश मुरलीधर यांना त्यांच्या कर्तव्याचे बक्षीस म्हणून त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. ही दडपशाही बघून हिटलरने सुद्धा शरमेने मान घातली असती.
#दडप'शाह'— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 27, 2020
