चक्क नितीन नांदगावकरांचा ‘हा’ व्हिडिओ फेसबुकने हटवला; नेटिझन्सकडून व्यक्त केलं जातंय आश्चर्य
मुंबई: काही दिवसांपूर्वी माटुंगा रेल्वे स्थानकात एका विकृताला महिलांचा विनयभंग केल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. जामिनावर सुटल्यावर शिवसेनेचे अँग्री यंग मॅन नितीन नांदगावकर यांनी परवा संध्याकाळी त्याला चांगलाच चोप देत, त्याकडून माफी वदवून सदर व्हिडिओ फेसबुक वर शेअर केला होता. या व्हिडिओला जवळपास ७,००,००० लोकांनी थेट पाहिले होते तर १६ हजार पेक्षा जास्त वेळा हा व्हिडिओ २४ तासांच्या आत शेअर झाला होता. पण काल उशिरा फेसबुककडून हा व्हिडिओ हटवण्यात आला. याबाबत आज नितीन नांदगावकरांनी एक फेसबुक पोस्ट लिहीत नाराजी व्यक्त केली व आपण असेच अशा विकृत समाजकंटकांना ठोकतच राहणार असे म्हटले.
आपल्या पोस्ट मध्ये पूढे शायरीच्या माध्यमातून ते म्हणाले कि, “सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं,मेरी कोशिश है ये सूरत बदलनी चाहिए”…….
होंसले मजबूत है काफी …..
अब मजबूर मंजिल होगी !!”
महिलांचा मानसन्मान राखला गेलाच पाहिजे ……
जिथे जिथे माझ्या गोरगरीब जनतेवर अन्याय होईल …..
तिथे तिथे मी पोचण्याचा प्रयत्न करत राहणार …..
नितीन नांदगावकरांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत या समाजकंटकाला गालांवर चांगलाच प्रसाद दिला होता. फेसबुक च्या नियमानुसार जर अशा प्रकारच्या पोस्टवर १०० पेक्षा जास्त लोकांनी रिपोर्ट केलं तर अशा पोस्ट फेसबुक कडून काढून टाकण्यात येतात.
हाच तो व्हिडिओ
