प्रशासनाच्या ठोस आश्वासनानंतर २६ जानेवारीला होणारे नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनचे आंदोलन मागे
नवी मुंबई: काल दिनांक २४ रोजी नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनच्या शिष्टमंडळाने अॅड सुरेश ठाकुर साहेब (सरचिटणीस) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थायी समिती सभापती नवीन गवते साहेबांची भेट घेऊन २४ फेब्रुवारी २०१५ ते एप्रिल २०१६ ह्या १४ महिन्याची सुधारीत किमान वेतनाची ९० कोटी रुपये थकबाकी महासभेने मंजुर केलेली असुन त्यास स्थायी समितीची मंजुरी मिळावी आणि कामगारांना ही रक्कम लवकरात लवकर मिळावी अशी मागणी केली असता, आजच आम्ही मिटींग मध्ये हा विषय मंजुर केला असुन येत्या आठवडाभरात कामगारांना त्यांचे हक्काचे पैसे मिळतील असे ठोस आश्वासन सभापती नवीन गवते साहेबांनी दिले आहे. तसेच पुढच्याच आठवड्यात अशासकिय ठरावाबाबत चर्चा करण्यासाठी अॅड .सुरेश ठाकुर सरचिटणीस (नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियन) यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. शिष्टमंडळामध्ये नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनचे सहचिटणीस श्री नरेंद्र वैराळ, कामगार प्रमुख यशवंत काळे, नवनाथ जगधने, मनोज भोईर, उपस्थित होते.
ह्या निर्णया मुळे २६ जानेवारी रोजी करण्यात येणारे आंदोलन तुर्तास रद्द करण्यात आले आहे.
