मध्य पूर्व प्रांतातील तणावाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात झाली मोठी घसरण
मुंबई: मुंबई शेअर बाजार व राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज मध्य पूर्व प्रांतातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजार ७८७.९८ अंकांनी पडून ४०,६७६.६३ अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजारही २३३.७० अंकांनी कोसळून ११,९९३ अंकांवर बंद झाला.
चलन बाजारात रुपयाच्या मूल्यात २९ पैशांची घसरण झाली. आज विनिमय दर ७२ रुपये नऊ पैसे प्रतिडॉलर इतका राहिला.
