Nila Vikhe Patil
भारतीय वंशाच्या नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्टीफन लोफवन यांनी जानेवारी महिन्यात स्वीडनच्या पंतप्रधान पदाचा कार्यभार हाती घेतला होता. स्टीफन लोफवन यांच्यासोबत नीला विखे पाटील काम करणार आहेत. नीला पाटील ह्या ख्यातनाम शिक्षण तज्ज्ञ अशोक विखे पाटील यांच्या कन्या आहेत.
स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात अर्थ विभागाच्या राजकीय सल्लागार म्हणून नीला पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून अर्थसंकल्प, वित्तीय बाजार आणि घर बांधणी संदर्भातील सर्व म्हत्वाची कामेे नीला पाहणार आहेत. अशी माहिती नीला यांचे वडील अशोक विखे पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली.
नीला विखे पाटील ह्या स्वीडनची राजधानी स्टॉकहोमच्या महापालिकेच्या निवडणूक समिती सदस्यही आहेत. त्यांनी गॉथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून इकॉनॉमिक्स आणि लॉ या विषयांसह एमबीए केले असून नंतर माद्रीदमधील कॉम्प्ल्यूटन्स विद्यापीठातूनही एमबीए केले आहे.
नीला विखे पाटील ह्या माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या त्या नात असून महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते बाळासाहेब विखे पाटील यांच्या त्या पुतणी आहेत.
