Coffee with Karan Hardik Pandya 2
‘कॉफी विथ करण’ या करण जोहरच्या कार्यक्रमामध्ये हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते.
महिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे राजस्थानमधील जोधपुरमध्ये लोकेश राहुल, हार्दिक पांड्या आणि करण जोहर या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल हे दोघे सहभागी झाले होते. या कार्यक्रमात करण जोहरशी गप्पा मारताना लोकेश राहुल आणि हार्दिकने महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे बीसीसीआयने राहुल आणि हार्दिक यांच्यावर कारवाई करत या दोघांना भारतीय संघातून काही काळ वगळले आहे. जोधपूरमधील देवाराम मेघवाल यांनी महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान तसेच महापुरुषांन बद्दल अपशब्द वापरल्याने हार्दिक, लोकेश आणि करण जोहर या तिघांविरोधात जोधपुरमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर या तिघांच्याही अडचणीत नवीन भर पडली आहे.
