Anand Teltumbade
डॉ. आनंद तेलतुंबडेंची अटक अवैध
ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांचे नक्षलवादी आणि माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन पुणे पोलिसांनी त्यांना आज पहाटे अटक केले होते.
आनंद तेलतुंबडे यांची अटक पुणे विशेष न्यायालयाने अवैध ठरवत त्यांना सोडण्याचे आदेश देखील दिले आहेत. विशेष न्यायाल्याने दिलेल्या या निर्णयामुळे पुणे पोलिसांना मोठा धक्का बसला आहे.
डॉ. आनंद तेलतुंबडे यांचा जिल्हा न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर उच्च न्यायालयात जाण्याआधीच त्यांना अटक करण्यात आली त्यामुळे ती अटक अवैध आहे. असे पुणे जिल्हा विशेष जिल्हा न्यायाधीश के. डी. वडणे यांनी सांगितले. डॉ. आनंद तेलतुंबडे यांना अटकेपासून संरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना चार आठवड्यांची मुदत दिली आहे.
महत्वाची बाब म्हणजे आनंद तेलतुंबडे यांचा जामीन अर्ज काल पुणे जिल्हा विशेष न्यायालयानेच फेटाळला होता. आज सकाळी मुंबई विमानतळावरून आनंद यांना पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर तेलतुंबडे यांना पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर याच न्यायालयाने आता ही अटक अवैध असल्याचा निर्णय दिला.
सर्वोच्च न्यायालयाने डॉ. आनंद तेलतुंबडे यांना अटकेपासून संरक्षणासाठी दिलेली चार आठवड्यांची मुदत 11 फेब्रुवारीला संपणार आहे.
