प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी गॅस सिलिंडर चिन्हावर लढणार आगामी विधानसभा निवडणूक
मुंबई, दि. १६: प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये सपाटून मार खावा लागला होता. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी आंबेडकरांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. आगामी विधानसभा निवडणूक वंचित चे उमेदवार कोणत्या चिन्हावर लढवणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं वंचित बहुजन आघाडी आणि प्रहार जनशक्ती पक्षाला निवडणूक चिन्ह दिलं आहे. वंचित चे सर्व उमेदवार गॅस सिलिंडर तर प्रहारचे उमेदवार बॅट या चिन्हावर निवडणूक लढवतील. जातीय सेना पक्षाला कोबी हे चिन्ह निवडणूक आयोगानं दिलंय.
Source – AIR
