शिबिरात तापाच्या रूग्णांचीही होणार रक्त तपासणी
नवी मुंबई, दि. ११: नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये सद्यस्थितीत पावसाची ये – जा सुरु असल्याने हिवताप – डेंग्यू, जललन्य व साथरोग आजारांसाठी ही परिस्थिती संवेदनशील आहे. त्या अनुषंगाने नमुंमपा आरोग्य विभागामार्फत हिवताप, डेंग्यू यासारख्या आजारांचा प्रसार रोखण्याकरीता संपूर्ण नमुंमपा कार्यक्षेत्रात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे प्रत्यक्ष सर्वेक्षण, नियोजित साप्ताहिक वेळापत्रकानुसार डासळीनाशक फवारणी व रासायनिक धुरीकरण, घरांतर्गत डासउत्पत्ती शोध मोहीमा नियमित स्वरुपात सुरु आहेत.
या व्यतिरिक्त मलोरिया – डेंग्यू प्रतिबंधात्मक विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महापालिका कार्यक्षेत्रात २४ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या परिसरात ३ व ५ ऑगस्ट रोजी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये हिवताप, डेंग्यू तसेच जललन्य व साथरोग आजारांबाबत प्रात्यक्षिके व मॉडेल्ससह जनजागृती करण्यात आली तसेच त्या क्षेत्रातील तापाच्या रूग्णांचे रक्तनमुनेही तपासण्यात आले. दोन दिवस आयोजित केलेल्या या शिबिरांमध्ये एकूण १९,६१५ नागरिकांनी शिबिरांचा लाभ घेतला. या ४८ ठिकाणी आयोजित शिबिरांमध्ये २४९१ रक्तनमुने घेण्यात आले. हे रक्तनमुने तपासणीअंती अदूषित (Negative) असल्याचे आढळून आले.
या मोहीमांमुळे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचता येते व त्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि कार्यवाहीची माहिती देता येते हे लक्षात घेत सोमवार दि. १२ ऑगस्ट २०२४ रोजी श्रावणी सोमवारचे औचित्य साधून २४ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांच्या परिसरात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
यामध्ये –
(1) सीबीडी नागरी आरोग्य केंद्र क्षेत्रात शिव मंदिर, बेलापूरगाव.
(2) करावे नागरी आरोग्य केंद्र क्षेत्रात नागेश्वरमंदिर, दारावेगाव.
(3) से-48 नागरी आरोग्य केंद्र क्षेत्रात से. ४८, शंकर मंदिर.
(4) नेरुळ 1 नागरी आरोग्य केंद्र क्षेत्रात शिवमंदिर, से.11, भिमाशंकर सोसायटी.
(5) नेरूळ 2 नागरी आरोग्य केंद्र क्षेत्रात पंचपरमेश्वर मंदिर,से.१०,नेरूळ.
(6) कुकशेत नागरी आरोग्य केंद्र क्षेत्रात गणेश शिवमंदिर, सेक्टर-12, सारसोळे बसडेपो बाजूला
(7) शिरवणे नागरी आरोग्य केंद्र क्षेत्रात सोमेश्वर मंदिर, सेक्टर १, शिरवणेगाव.
(
सानपाडा नागरी आरोग्य केंद्र क्षेत्रात बुध्देश्वर मंदिर, सानपाडा पाम बिच.
(9) तुर्भे नागरी आरोग्य केंद्र क्षेत्रात शिवमंदिर, से.२१, तुर्भेगाव.
(10) पावणे नागरी आरोग्य केंद्र क्षेत्रात पावणेश्वर शिवमंदिर, पावणेगांव.
(11) इंदिरानगर नागरी आरोग्य केंद्र क्षेत्रात फायझर कंपनी, डी-19.
(12) जुहुगाव नागरी आरोग्य केंद्र क्षेत्रात सोमेश्वर सोसायटी (शिव मंदिर).
(13) वाशीगाव नागरी आरोग्य केंद्र क्षेत्रात जागृतेश्वर शिव मंदिर, सेक्टर-7, वाशी.
(14) खैरणे नागरी आरोग्य केंद्र क्षेत्रात शिव मंदिर, सेक्टर-10, कोपरखैरणे.
(15) महापे नागरी आरोग्य केंद्र क्षेत्रात एकवीरा झोपडपट्टी जवळील बांधकाम, महापे MIDC, अडवली भूतवली गावाजवळ.
(16) घणसोली नागरी आरोग्य केंद्र क्षेत्रात भैरव बांधकाम, सेक्टर-११, घणसोली.
(17) राबाडा नागरी आरोग्य केंद्र क्षेत्रात विघ्नहर्ता अपार्टमेंट जवळ, साळवी नगर समोर, राबाडा, सिध्दार्थ नगर.
(18) कातकरीपाडा नागरी आरोग्य केंद्र क्षेत्रात दुर्गामाता मंदिर भीमनगर.
(19) ऐरोली नागरी आरोग्य केंद्र क्षेत्रात से-3, शिवमंदिर.
(20) चिंचपाडा नागरी आरोग्य केंद्र क्षेत्रात शंकर मंदिर, देवीधाम नगर.
(21) दिघा नागरी आरोग्य केंद्र क्षेत्रात रहेजा बांधकाम.
(22) इलठणपाडा नागरी आरोग्य केंद्र क्षेत्रात कल्पतरू बांधकाम, दिघा MIDC.
(23) नेासीलनाका नागरी आरोग्य केंद्र क्षेत्रात शिव मंदिर, सेक्टर-29, रबाले.
(24) घणसोली से-4 नागरी आरोग्य केंद्र क्षेत्रात शिव मंदिर, सेक्टर-06, घणसोली.
याप्रमाणे – नमूद 24 ठिकाणी सर्व तापाच्या रुग्णांचे रक्तनमुने घेण्यात येणार आहेत तसेच हिवताप – डेंग्यू, जललन्य व साथरोग आजारांबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात येणार आहे. या शिबीरांची वेळ सकाळी 10:00 ते दुपारी 2:00 वाजेपर्यंत असणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात हिवताप – डेंग्यू, जललन्य व साथरोग आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सातत्यपूर्ण उपाययोजना करीत आहे. यामध्ये नागरिकांच्या प्रत्यक्ष सहभागाची आवश्यकता असून, नमुंमपा कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी आयोजित केलेल्या या शिबिरांचा आपल्या घराजवळील ठिकाणी लाभ घ्यावा व ताप असल्यास रक्ताची तपासणी करुन घ्यावी तसेच हिवताप – डेंग्यू, जललन्य व साथरोग आजार होऊ नयेत याकरिता घ्यावयाची खबरदारी याविषयी प्रात्यक्षिकांसह माहिती घ्यावी असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
