एप्रिल ते जून २०२४ या काळात देशातील संकलित एकंदर निर्यात ८.६०% पर्यंत वाढेल अशी अपेक्षा
जून 2023 मध्ये झालेल्या 34.32 अब्ज अमेरिकी डॉलर्स मूल्याच्या व्यापारी मालाच्या निर्यातीशी तुलना करता जून 2024 मध्ये यात 2.55%ची म्हणजेच 35.20 अब्ज अमेरिकी डॉलर्सची सकारात्मक वाढ नोंदवली गेली
नवी दिल्ली, दि. १५: जून 2024 मध्ये भारताची एकूण निर्यात (व्यापारी माल आणि सेवा यांचा एकत्रित विचार करून) 65.47 अब्ज अमेरिकी डॉलर्स होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जून 2023 मध्ये देशातून झालेल्या एकूण निर्यातीमध्ये झालेली ही 5.40%ची सकारात्मक वाढ आहे.
* तक्ता 1: जून 2024 मध्ये झालेला व्यापार
| June 2024
(USD Billion) |
June 2023
(USD Billion) |
||
| Merchandise | Exports | 35.20 | 34.32 |
| Imports | 56.18 | 53.51 | |
| Services* | Exports | 30.27 | 27.79 |
| Imports | 17.29 | 15.61 | |
| Total Trade
(Merchandise +Services) * |
Exports | 65.47 | 62.12 |
| Imports | 73.47 | 69.12 | |
| Trade Balance | -8.00 | -7.00 |
टीप: रिझर्व्ह बँकेने जारी केलेला सेवा क्षेत्राचा डाटा मे 2024 साठीचा आहे. जून 2024चा डाटा हा अंदाज असून रिझर्व्ह बँकेने नंतरचा डाटा जारी केल्यानंतर त्यात सुधारणा करण्यात येईल.

- आकृती 1: जून 2024 दरम्यान झालेला एकूण व्यापार
- एप्रिल ते जून 2024 या काळात देशातून होणारी एकंदर निर्यात 8.60% ची सकारात्मक वाढ नोंदवत 200.33 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.एप्रिल ते जून 2024 या कालावधीत देशात 8.47% ची वाढ नोंदवत 222.89 अब्ज डॉलर्स मूल्याची आयात करण्यात आली आहे.* तक्ता 2: एप्रिल ते जून 2024 दरम्यान झालेला व्यापार
| April-June 2024
(USD Billion) |
April-June 2023
(USD Billion) |
||
| Merchandise | Exports | 109.96 | 103.89 |
| Imports | 172.23 | 160.05 | |
| Services* | Exports | 90.37 | 80.57 |
| Imports | 50.67 | 45.45 | |
| Total Trade
(Merchandise +Services) * |
Exports | 200.33 | 184.46 |
| Imports | 222.89 | 205.50 | |
| Trade Balance | -22.56 | -21.03 |
आकृती 2 : एप्रिल ते जून 2024 दरम्यान झालेला एकूण व्यापार

विविध प्रकारच्या मालाचा व्यापार
· जून 2023 मध्ये 34.32 अब्ज डॉलर्स मूल्याचा माल निर्यात झाला होता तर जून 2024 मध्ये 35.20 अब्ज डॉलर्स मूल्याचा माल निर्यात झाला.
· जून 2023 मध्ये झालेल्या 53.51अब्ज डॉलर्स किमतीच्या मालाच्या आयातीच्या तुलनेत जून 2024 मध्ये 56.18 अब्ज डॉलर्स किमतीच्या मालाची आयात झाली.
आकृती 3: जून 2024 मध्ये झालेला माल व्यापार

- एप्रिल ते जून 2023 या कालावधीत 103.89 अब्ज डॉलर्स मूल्याच्या मालाची निर्यात झाली होती, त्या तुलनेत एप्रिल ते जून 2024 या कालावधीत 109.96 अब्ज डॉलर्स मूल्याच्या मालाची निर्यात झाली.
- एप्रिल ते जून 2023 या कालावधीत 160.05 अब्ज डॉलर्स मूल्याच्या मालाची आयात झाली होती, त्या तुलनेत एप्रिल ते जून 2024 या कालावधीत 172.23 अब्ज डॉलर्स मूल्याच्या मालाची आयात करण्यात आली.
- एप्रिल ते जून 2023 या कालावधीत आलेल्या 56.16 अब्ज डॉलर्सच्या व्यापारी तुटीच्या तुलनेत एप्रिल ते जून 2024 या काळात एप्रिल ते जून 2024 या कालावधीत देशाला 62.26 अब्ज डॉलर्सची व्यापारी तूट आली.
आकृती 4: एप्रिल ते जून 2024 या कालावधीत झालेला माल व्यापार

- जून 2023 मध्ये बिगर-पेट्रोलियम उत्पादने तसेच रत्ने आणि आभूषणे वगळता 25.29 अब्ज डॉलर्स मूल्याची निर्यात झाली त्या तुलनेत जून 2024 याच प्रकारच्या मध्ये 27.43 अब्ज डॉलर्स मूल्याच्या मालाची निर्यात झाली.
- जून 2024 मध्ये 36.04 अब्ज डॉलर्स मूल्याची बिगर पेट्रोलियम उत्पादने, रत्ने आणि आभूषणे वगळता (सोने,चांदी आणि मौल्यवान धातू) यांची आयात झाली. जून 2023 मध्ये याच प्रकारातील 33.66 अब्ज डॉलर्स मूल्याच्या वस्तू आयात करण्यात आल्या होत्या.

सेवाविषयक व्यापार
जून 2023 मध्ये झालेल्या 27.79 अब्ज डॉलर्स मूल्याच्या सेवांच्या निर्यातीच्या तुलनेत जून 2024 मध्ये 30.27 अब्ज डॉलर्स मूल्याच्या सेवांची निर्यात झाली असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
जून 2023 मध्ये झालेल्या 15.61 अब्ज डॉलर्स मूल्याच्या सेवांच्या आयातीच्या तुलनेत जून 2024 मधील 17.29 अब्ज डॉलर्स मूल्याच्या सेवांची अंदाजित आयात आहे.
एप्रिल ते जून 2023 या काळात 80.57 अब्ज डॉलर्स मूल्याच्या सेवांची निर्यात झाली होती तर एप्रिल ते जून 2024 या काळात 90.37 अब्ज डॉलर्स मूल्याच्या सेवांची निर्यात होईल असा अंदाज आहे.
एप्रिल ते जून 2023 या काळात 45.45 अब्ज डॉलर्स मूल्याच्या सेवा आयात करण्यात आल्या, त्यांच्या तुलनेत एप्रिल ते जून 2024 या काळात 50.67 अब्ज डॉलर्स मूल्याच्या सेवा आयात झाल्या आहेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
