क्रिकेट विश्वचषका निमित्त गूगल चे खास ‘डूडल’
ICC World cup 2019 ला आजपासून सुरुवात होत आहे. या निमित्ताने गूगल ने आज एक अनोखं डूडल बनवलं आहे. ज्यात ‘O’ च्या जागी बॉल आणि ‘L’ च्या जागी विकेट दिसत आहेत. हे डूडल केवळ एक फोटो नव्हे तर विडिओ सारखे आहे.
तुम्हाला सांगू इच्छितो की या वर्ल्ड कपचा पहिला सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिके दरम्यान होणार आहे. भारताचा पहिला सामना ५ जून ला दक्षिण आफ्रिके विरुद्ध असेल.