खुला बाजार विक्री योजना (देशांतर्गत) एकविसाव्या ई-लिलावाच्या फेरीत २३३४ बोलीदारांनी २.८४ लाख मेट्रिक टन गहू आणि ५८३० मेट्रिक टन तांदूळ केले खरेदी
नवी दिल्ली, दि. १७: भारत सरकारच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून, तांदूळ, गहू आणि पीठाच्या किरकोळ किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून बाजारात हस्तक्षेप करून, गहू आणि तांदूळ या दोन्हींचे साप्ताहिक ई लिलाव आयोजित केले जात असतात. खुला बाजार विक्री योजना (देशांतर्गत) २१व्या ई-लिलाव फेरीत १५.११.२०२३ रोजी ३ लाख मेट्रिक टन गहू आणि १.७९ लाख मेट्रिक टन तांदूळ लिलावासाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी २.८४ लाख मेट्रिक टन गहू आणि ५८३० मेट्रिक टन तांदूळ २३३४ बोली लावणाऱ्यांना विकण्यात आले.
याव्यतिरिक्त, २.५ एलएमटी गहू केंद्रीय भांडार /भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ, NCCF/नाफेड सारख्या निम-शासकीय आणि सहकारी संस्थांना खुल्या बाजार विक्री योजनेत (देशांतर्गत) गव्हाचे पिठात रूपांतर करण्यासाठी देण्यात आला आहे. हे पीठ ‘भारत आटा’ या ब्रँड अंतर्गत किरकोळ विक्रीसाठी २७.५०/किलो
रुपयांहून जास्त किंमत न घेता विक्रीसाठी उपलब्ध करता येईल. १४.११.२३ पर्यंत १५३३७ मेट्रिक टन गहू या तीन सहकारी संस्थांकडून पीठात रुपांतरित करण्यासाठी उचलण्यात आला आहे.
व्यापार्यांना खुला बाजार विक्री योजना (देशांतर्गत) गहू विक्रीच्या लिलावांपासून दूर ठेवण्यात आले आहे.साठेबाजी टाळण्यासाठी १४.११.२०२३ पर्यंत देशभरात १९१७ ठिकाणी पूर्वसूचना न देता तपासण्या करण्यात आल्या आहेत.
