छत्तीसगड, मध्य प्रदेश, मिझोरम, राजस्थान आणि तेलंगणा विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुका, २०२३
नवी दिल्ली, दि. ९: निवडणूक आयोगाने छत्तीसगड, मध्य प्रदेश, मिझोरम, राजस्थान आणि तेलंगणा विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुका, २०२३ साठीचा कार्यक्रम निश्चित केला आहे. हवामानाची परिस्थिती, शैक्षणिक वेळापत्रक, बोर्ड परीक्षा, प्रमुख सण, संबंधित राज्यांमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांची उपलब्धता, हालचाली, वाहतूक आणि वेळेवर तैनाती आणि इतर संबंधित प्रत्यक्ष वास्तवाचे सखोल मूल्यांकन या सर्व संबंधित बाबी विचारात घेऊन निवडणूक आयोगाने या विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक तयार केले आहे.
आयोगाने सर्व संबंधित बाबींचा विचार करून लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या संबंधित तरतुदींनुसार सार्वत्रिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यासाठी छत्तीसगड, मध्य प्रदेश, मिझोरम, राजस्थान आणि तेलंगणा राज्यांच्या राज्यपालांना शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे.
