राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून अल्पसंख्यांक विभागातील पदाधिकार्यांच्या नव्याने नियुक्त्या
मुंबई, दि. २९: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आ. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष सिराज मेहदी यांच्या मान्यतेने सुहेल सुभेदार यांची ‘मुंबई विभागीय कमिटी अध्यक्ष’ पदी (अल्पसंख्यांक विभाग) व सिराज अहमद अब्दुल समद यांची ‘मुंबई विभागीय कमिटी कार्याध्यक्ष’ पदी (अल्पसंख्यांक विभाग) नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी माजी मंत्री, आ. अनिल देशमुख, पक्षाचे राष्ट्रीय चिटणीस नसीम सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नगरालकर, प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार व अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब हे उपस्थित होते.
