जागतिक तंबाखू विरोधी दिन निमित्त उद्या नांदेड व परभणी येथे विशेष प्रचार कार्यक्रमाचे आयोजन
नांदेड, दि. ३०: केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरो कार्यालय व जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय परभणी, मराठवडा ग्रामीण विकास संस्था यांच्या संयूक्त विद्यमाने दिनांक ३१ मे २०२३ रोजी सकाळी ८ वाजता जिल्हा रुग्णालय परभणी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेने “आम्हाला अन्न हवे, तंबाखू नको” या संकल्पनेवर अधारित कार्यक्रमाचे आयोजन केले असून या निमित्त परभणी शहरात रॅली, रांगोळी स्पर्धा आणि पोस्टर स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा दिवानी न्यालयाचे न्यायाधीश एस.जी. लांडगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आधिष्ठाता डॉ. शिवाजी सूक्रे, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. सुहास जगताप, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ.जयश्री यादव, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याण कदम, जिल्हा माहिती अधिकारी अरूण सूर्यवंशी, क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी सुमित दोडल मराठवाडा ग्रामिण विकास संस्थेचे अभिजीत संघई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आजची तरुण पीढी व्यसनाच्या विळख्यात अडकली असून, जागतिक पौढ तंबाखू सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात २८.६ टक्के जनता तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात, त्याचे गंभीर परिणाम समाजाला भोगावे लागत आहेत तसेच तंबाखूच्या व्यसनापासून होणा-या आजारांना जनता बळी पडत आहे. तंबाखू सेवनाला आळा घाल्यण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध विभांगाच्या वतीने जनजागृतीचे विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. या कार्यक्रमानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम, मार्गदर्शन व विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
