शिक्षेला स्थगिती देण्याची राहुल गांधी यांची मागणी सुरतच्या सत्र न्यायालयाने फेटाळली
सुरत, दि. २०: मोदी आडनावावरुन केलेल्या टिप्पणी प्रकरणी झालेल्या शिक्षेला स्थगिती देण्याची राहुल गांधी यांची मागणी सुरतच्या सत्र न्यायालयाने फेटाळली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. पी. मोगरा यांनी आज हा निर्णय दिला.
मोदी आडनावावरुन राहुल गांधी यांनी बदनामीकारक टिप्पणी केल्याची तक्रार भाजपाचे गुजरातमधले आमदार पूर्णेश मोदी यांनी केली होती. त्यावर राहुल गांधी यांना दोषी ठरवून २ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुरतच्या महानगर दंडाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याला स्थगिती द्यावी अशी मागणी करणारा अर्ज गांधी यांनी सुरतच्या सत्र न्यायालयात दाखल केला होता. गांधी यांना शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाली आहे. आपण या प्रकरणातून सहज सुटून जाऊ असं राहुल गांधी यांना वाटत होतं परंतु कायदा सर्वांसाठी सारखाच आहे अशी प्रतिक्रीया भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.
Source – AIR
