रायगड ची सुपुत्री अमेघा घरतला कुस्ती स्पर्धेत कास्यपदक
उरण, दि. २७(विठ्ठल ममताबादे): खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेतील रौप्य पदक विजेती, रायगड जिल्ह्याची रणरागिणी पै. अमेघा अरून घरत हीने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आजारी असून सूध्दा उल्लेखनीय कामगिरी करून रायगड जिल्ह्याला कांस्यपदक मिळवून देण्याची कामगिरी पार पाडली आहे. सांगली येथे भरलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कास्य पदक मिळवून अमेघा घरतने रायगड जिल्ह्याचे नाव मोठे केले आहे.
दि. २३ मार्च ते २४ मार्च २०२३ रोजी सांगली येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वरिष्ठ २४ व्या महाराष्ट्र राज्य महिला अजिंक्यपद आणि पहिली महिला केसरी कुस्ती स्पर्धेत कोकणातील महिला कुस्तीगीरांनी नेत्रदीपक कामगिरी केली. राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील उरण तालूक्याची सूकन्या व सी के टि काॅलेज पनवेलची स्टार पैलवान पै. अमेघा अरुण घरत हिने ५९ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले आहे. सी. के. टी काॅलेजचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, मार्गदर्शक डॉ. विनोद नाईक, वस्ताद राष्ट्रीय पैलवान रूपेश पावशे, वस्ताद डि. बी. भाई म्हात्रे व आई बाबा यांचे अमेघा घरतला नेहमी मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. अमेघा हि सी के टी कालेज व छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय कुस्ती संकुल नितलस तालमीत सराव करते. अमेघा घरत हिला कुस्ती स्पर्धेत कास्य पदक मिळाल्याने तीचे सर्वच स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
