जमीन घोटाळ्या प्रकरणी सीबीआयकडून चौकशी
नवी दिल्ली, दि. ७: नोकरीच्या बदल्यात जमीन मागितल्याच्या घोटाळ्याप्रकरणी माजी रेल्वेमंत्री आणि राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांची चौकशी सीबीआय करत आहे. यूपीए सरकारच्या काळात रेल्वे मंत्री असताना लालू प्रसाद आणि त्यांच्या कुटुंबानं रेल्वेतील नोकरीच आमिष दाखवून जमिनी घेतल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे.
लालू प्रसाद यांची चौकशी करण्यासाठी सीबीआयचे एक पथक आज सकाळी नवी दिल्लीत राजद खासदार मीसा भारती यांच्या निवासस्थानी पोहोचलं. लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांची पाटणा इथल्या निवासस्थानी काल सीबीआयनं चौकशी केली होती.
Source – AIR
