पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा
नाशिक, दि. २६: येत्या पंधरा दिवसात भगूर हे पर्यटन स्थळ घोषित होईल अशी घोषणा राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. सावरकरांच्या वास्तव्यामुळे भगूर सर्वांसाठी तीर्थस्थळ झालं आहे. भगूर पर्यटन स्थळ घोषित करण्याबरोबरच भगूर मधल्या सावरकर थीम पार्क वस्तू संग्रहालयाचं काम पुढच्या वर्षीच्या सावरकर जयंती पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असं राज्याचे ते म्हणाले. आज नाशिक जिल्ह्यातल्या भगूर या सावरकरांच्या जन्मगावी असलेल्या सावरकर स्मारकात त्यांनी सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली त्याचबरोबर सावरकरांच्या पूजेतील अष्टभुजा देवीच्या पालखीसह अभिवादन रॅली काढण्यात आली