उद्धव ठाकरे यांच्याकडून मातोश्रीवर पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आणि नेत्यांची बैठक संपन्न
मुंबई, दि. १८: उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री निवासस्थानी नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी सर्वांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक आयोगावर टीका केली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं. तुम्ही धनुष्य बाण घेऊन निवडणूक लढा आणि आम्ही मशाल घेऊन लढतो. आमचे कार्यकर्ते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा पराभव करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यापूर्वी पक्षाचं नाव आणि पक्षाच्या चिन्हावरुन जेव्हा जेव्हा वाद झाला तेव्हा कुणालाही मूळ चिन्ह आणि पक्षाचं नाव दिलं गेला नसल्याचा दावा त्यांनी केला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं कालच त्यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं होतं.
Source – AIR
