सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात
मुंबई, दि.१५: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSE च्या परीक्षा आज पासुन देशातील ७ हजार दोनशे केंद्रांवर चालू झाल्या आहेत. या वर्षी १० वी आणि १२वी बोर्डाच्या परीक्षा १५ फेब्रुवारी ते ५ एप्रिल दरम्यान होणार आहेत. यापूर्वी सीबीएसईने सांगितले की, बारावीची प्रश्नपत्रिका तयार करताना जेईई मुख्य परिक्षेसह स्पर्धात्मक परीक्षांची ही काळजी घेण्यात आली आहे. CBSE च्या मते, एकूण २१लाख ८० हजार उमेदवारांनी दहावीसाठी आणि १६ लाख ९० हजार उमेदवारांनी १२ वीच्या परिक्षेसाठी नोंदणी केली आहे. CBSE च्या मते जगभरातील २६ देशांमध्ये या परिक्षा होणार असून इयत्ता १०वीच्या परीक्षा ७६ विषयांसाठी घेतल्या जातील आणि २१ मार्च रोजी संपतील. इयत्ता १२वीच्या परीक्षा एकूण ११५ विषयांसाठी घेतल्या जातील आणि ५ एप्रिल रोजी संपतील. शिवाय, शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर न करण्यात बाबतही निर्देश दिले आहेत.
