भगत सिंग कोश्यारी यांचा राज्यपाल पदाचा राजीनामा मंजूर, ‘हे’ होतील नवीन राज्यपाल
मुंबई, दि. १२: आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नियुक्तीपासूनच चर्चेत राहिलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला आहे. त्यांच्याजागी राष्ट्रपती मूर्मु यांनी रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे.
कोश्यारी यांनी आपल्या भाषणांदरम्यान अनेक महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केली. या वादग्रस्त वाक्तव्यांनंतर विरोधकांनी त्यांच्या विरोधात आंदोलनं ही केली. परंतू, मागील काही दिवसांपासून विरोधी पक्षांकडून त्यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी केली जात होती हे विशेष. यानंतरच भगत सिंग कोश्यारी यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे मंजूरीसाठी पाठवला व आज अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालं.
