नरेंद्र मोदींनी पवारांच्या घरात लक्ष देऊ नये : शरद पवार
परतूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कुटुंबावर पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा आपल्या भाषणात टीका केली. याच टिकेला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
माझ्या पुतण्यानं सगळ्या घराचा कारभार केला तरी मला चिंता नाही, माझ्या परिवाराची चिंता प्रपंच नसलेल्या मोदी यांनी करू नये, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना लगावला. परभणी लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ सोमवारी परतूर येथील सभेत ते बोलत होते.
मोदींना घर कस चालवायचं हेच माहीत नाही. असं असताना ते दुसऱ्याच्या घरात सारखं डोकावतात. त्यांना मी सांगणार आहे की हे वागणं बरं नव्हं मोदीजी”, अशा शब्दात पवारांनी मोदींवर जोरदार टीका केली.
“जेव्हा पण मोदी मला भेटतील तेव्हा मी त्यांना सांगणार आहे की माझ्या पोरीचं लग्न झालं आहे, मला कसली चिंता नाही. माझ्या पुतण्यानं सगळ्या घराचा कारभार केला तरी चिंता मला नाही”, तसेच माझ्या घरातील माहिती तुम्हाला कशाला हवी आहे असंही विचारणार असल्याचं पवार म्हणाले.
