‘५६ इंचाचं तर गोदरेजचं कपाट येतं’, अभिनेता रितेश देशमुखने उडवली पंतप्रधान मोदींची खिल्ली
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अभिनेते रितेश देशमुख याने काँग्रेसच्या एका मंचावर भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.
‘५६ इंचाची छाती’ या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर रितेश देशमुखने खिल्ली उडवताना ५६ इंचाचं तर गोदरेजचं कपाट येतं, असं त्यांने म्हटलं आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
रितेशचा हा व्हिडीओ लातूर येथील काँग्रेसच्या एका सभेचा असल्याचं बोललं जात आहे. “५६ इंचाची छाती आहे असं ते सांगतात. ५६ इंचाचं तर गोदरेजचं कपाट येतं. देश चालवायला ५६ इंचाची छाती नाही चांगलं हृदय लागतं, हे प्रियंका गांधींचं वाक्य मला आठवतं”, असं रितेश या व्हिडीओत म्हणाताना दिसतो.
आज आपण फेसबूक, ट्विटर वापरतो त्यासाठी लागणारा काॅम्प्युटर आणि मोबाईल ही काँग्रेसची देण आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले हे देखील काँग्रेसचीच देणं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवावं, असे रितेशने म्हटले आहे.
