Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बेळगावातल्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारने नाकारली परवानगी

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बेळगावातल्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारने नाकारली परवानगी

कोल्हापूर, दि. १९: महाराष्ट्र एकीकरण समितीचा बेळगावमधला महामेळावा रद्द झाल्यावर महाराष्ट्रातल्या नेत्यांना बेळगावमध्ये प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बेळगावला जायचा निर्धार केला होता. मात्र त्यांना कर्नाटक पोलिसांनी रोखल्यावर नेत्यांनी ठिय्या आंदोलन केलं. हसन मुश्रीफ यांच्यावर थेट काठी उगारण्यापर्यंत कर्नाटक पोलिसांची मजल गेली.

कोल्हापूरमधल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज कोगनोळी टोलनाक्यावरून बेळगावला जायचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना रोखलं. गेल्या ६२ वर्षांपासून सीमाभागावर अन्याय होत असल्याने हा भाग केंद्रशासित केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *