भूपेंद्र पटेल यांनी गुजरात च्या मुख्यमंत्रिपदाची घेतली शपथ
अहमदाबाद, दि. १२: आज राज्याच्या १६ मंत्र्यांसह मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हर्ष संघवी यांच्याकडे मंत्रिमंडळ विभागाचे सर्वात महत्त्वाचे खाते आले असून, त्यांच्याकडे गृह मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला आहे. यासोबतच संघवी यांना क्रीडा आणि युवा मंत्रालयही देण्यात आले आहे. नागरी पुरवठा, पीडब्ल्यूडी आणि महसूल विभाग सीएम भूपेंद्र पटेल यांनी स्वत:कडे ठेवला आहे.
मात्र, सध्या मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सामान्य प्रशासन, प्रशासकीय सुधारणा, प्रशिक्षण आणि नियोजन, गृहनिर्माण आणि पोलिस गृहनिर्माण, महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन, नगरविकास आणि नागरी गृहनिर्माण, पंचायत, रस्ते आणि इमारत आणि भांडवली नियोजन, खाणी आणि खनिजे, या खात्यांचा कार्यभार स्वीकारला आहे. तीर्थक्षेत्र विकास, नर्मदा आणि कल्पसर, बंदरे, माहिती आणि प्रसारण, अंमली पदार्थ आणि उत्पादन शुल्क, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सर्व धोरणात्मक बाबी आणि इतर विषय मंत्र्यांना दिलेले नाहीत.
