जामीनाचा निर्णय पुढल्या १० दिवसांसाठी ठेवला स्थगित
मुंबई, दि. १२: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन देण्याबाबतचा आपला निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं पुढल्या १० दिवसांसाठी स्थगित केला आहे. देशमुख यांच्या विरोधात भ्रष्टाचार विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल असून या प्रकरणी न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या समोर गेल्या आठवड्यात सुनावणी झाली होती. त्यानंतर न्यायालयानं आज देशमुख यांना जामीन मंजूर केला होता. न्यायालयाच्या या निर्णयाला सीबीआय सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. त्यामुळे पुढले १० दिवस देशमुख यांची कोठडी कायम राहील.
देशमुख यांना गेल्या वर्षी २ नोव्हेम्बर रोजी सक्तवसुली संचालनालयानं १२ तासांच्या चौकशी नंतर अटक केली होती. त्यानंतर सीबीआय नं देखील त्यांना भ्रष्टाचार विरोधी कायद्या अंतर्गत अटक केली होती.
