४० जागा जिंकत कॉंग्रेस ने हिमाचल चा गड केला सर
शिमला, दि. ८: हिमाचल प्रदेशात विधानसभेच्या ६८ जागांसाठी १२ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान झाले. या निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी आज ८ डिसेंबर रोजी झाली आणि गुजरात गमावलेल्या कॉंग्रेस ला जरा हायसं वाटलं. जाहीर झालेल्या अंतिम निकालानुसार, हिमाचल प्रदेशमध्ये ६८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने बहुमताचा आकडा पार करत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत काँग्रेसला ४० जागा मिळाल्या तर भाजपला फक्त २५ जागा राखता आल्या.
हिमाचल निवडणुकीत कोणाला किती जागा मिळाल्या जाणून घ्या
कॉंग्रेस INC-40
भाजप-25
स्वतंत्र-3
हिमाचलमधील पक्षांची मते जाणून घ्या
काँग्रेस – 43.90 टक्के
भाजप – 43.00 टक्के
आप – 1.10 टक्के
बसपा – 0.35 टक्के
CPI – 0.01 टक्के
सीपीआय(एम) – 0.66 टक्के
इतर – 10.39 टक्के
NOTA – 0.59 टक्के
