भारतीय संविधान पुस्तकाचे पूजन करून उरण नगर परिषद वाचनालयात संविधान दिन साजरा
उरण, दि. २६(विठ्ठल ममताबादे): २६ नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतात भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. या संविधान दिना निमित्त उरण मध्ये विविध संस्था, संघटनांतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उरण शहरात विमला तलावा शेजारी असलेल्या उरण नगर परिषदेच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे सार्वजनिक ग्रंथालयामध्ये भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय राज्यघटना पुस्तकाचे पूजन करून संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी उरण नगर परिषदेचे माँसाहेब मीनाताई ठाकरे ग्रंथालयचे कर्मचारी जयेश वत्सराज, अभिषेक कोळी, मेघना कोळी, इम्रान खान, देविना मुंबईकर, संजय म्हात्रे, दादाराम कळकुंबे, बळीराम कोळी, शुभम गौडदाब आदी वाचक वर्ग, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
