विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी कार चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
मुंबई, दि. १६: शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी कार चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातल्या रसायनी पोलीस स्थानकात चालक एकनाथ कदम याच्याविरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्याला ताब्यात घेतलं जाणार आहे. मेटे यांच्या निधनाची सीआयडी चौकशी करण्यात आली, त्यानंतर आलेल्या अहवालावरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला. विनायक मेटे यांच्या गाडीला १४ ऑगस्ट २०२२ ला मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात झाला होता.
Source – AIR
