ऋतुजा लटके ५३,४७१ मतांनी विजयी
अंधेरी, दि. ६: महाराष्ट्राच्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या जागेवर शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके विजयी झाल्या आहेत. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके ५३,४७१ मतांनी विजयी झाल्या आहेत. भाजपने या जागेवरील उमेदवारी मागे घेतल्याने ही लढत एकतर्फी झाली.
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके यांनी भाजपकडून कोणतीही सहानुभूती मिळाली नसल्याचे सांगितले. निवडणुकीपूर्वी त्यांनी एक सर्व्हे केला होता, त्यात भाजपचा पराभव होत असल्याचे त्यांना कळले होते. त्यामुळेच त्यांनी आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेतला. हा माझा विजय नाही, हा विजय माझे दिवंगत पती रमेश लटके यांचा विजय आहे. सर्वप्रथम मी रमेश लटके यांची अपूर्ण विकासकामे पूर्ण करीन. मी मातोश्रीवर जाऊन महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे मनापासून आभार मानेन. विजयाबाबत कोणताही आनंदोत्सव साजरा केला जाणार नाही.
