प्रचाराच्या रॅलीत काँग्रेसच्या नेत्याचा नागीन डान्स
बंगळूर: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. देशभरात सात टप्प्यांमध्ये मतदान होणार असून महिन्याभर मतदानाची प्रक्रिया सुरु राहणार आहे. प्रचारादरम्यान मतदारांना आकर्षित करण्यासाठी नेते मंडळी एकमेकांवर टिका करण्यापासून ते फिल्मी डायलॉगबाजीपर्यंत अनेक गोष्टी करताना दिसत आहेत.
कर्नाटकचे गृहमंत्री आणि काँग्रेसचे आमदार एमटीबी नागराज यांनी तर प्रचारासाठी खूप आगळा वेगळा फंडा अजमवला आहे. एमटीबी नागराज यांनी एका प्रचारसभेदरम्यान चक्क ‘नागीण’ या सिनेमातील गाण्यावर नागीण डान्स केला आहे. या डान्सचा व्हिडीओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
काँग्रेसचे उमेदवार विरप्पा मोईली यांना मतदान करा असं सांगण्यासाठी नागराज चिक्काबल्लापूरा मतदारसंघातील या गावात आले होते. त्यावेळी मतदारांना आकर्षित करण्यासाठी नागराज यांनी नागीण डान्स करण्यास सुरुवात केली. नागराज यांना नाचताना पाहून समर्थकही त्यांच्याबरोबर नागीण डान्स करु लागले. नागराज यांचा हा नागीण डान्स जवळजवळ १० मिनिटे चालला.
प्रचारासाठी नेतेमंडळी काय करतील याचा काही नेम नाही.
