कोल्हापूर विमानतळावर आजपासून नाईट लँडिंग सुविधा सुरु
कोल्हापूर, दि. ३ : कोल्हापूर विमानतळावर आजपासून नाईट लँडिंग सुविधा सुरु होणार आहे. त्यामुळे विमानतळ विकासाच्या प्रकियेतला महत्वाचा टप्पा पार होणार आहे.
नाईट लँडिंग सुविधा कार्यरत करण्यासाठी पूर्ण तयारी झाली आहे. राज्य सरकारनं जागा उपलब्ध करून दिल्यानंतर कोल्हापूर विमानतळावरच्या धावपट्टीचं विस्तारीकरण केलं आहे. विस्तारीकरणानंतर धावपट्टी १ हजार ७८० मीटर झाली आहे. या धावपट्टीवर नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे.

धावपट्टीवर मार्किंगही केलं आहे. आजपासून विस्तारित धावपट्टी पूर्ण क्षमतेनं वापरता येणार आहे.कोल्हापूर विमानतळाच्या टर्मिनल बिल्डींगचं कामही वेगानं सुरु असून येत्या ३१ मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याचं नियोजन आहे.
Source – AIR
फोटो प्रतीनिधिक आहे